निसर्गाचा अद्भुत अविष्कार : राधानगरी

Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Go to content

निसर्गाचा अद्भुत अविष्कार : राधानगरी

Radhanagari Wildlife Sanctuary
कोल्हापूर जिल्हा आजही सुजलाम-सुफलाम असण्याचे कारण म्हणजे केवळ राधानगरी धरण होय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी इंग्लंडला जाऊन आल्यानंतर त्यांना प्रजेच्या हिताची ही कल्पना सुचली. आपल्या राज्यासाठी इसवी सन १९०७ रोजी शाहू महाराजांना दाजीपूरच्या जंगलात भोगावती नदीवर मोठे धरण बांधण्याची योजना आखली. एप्रिल १९०७ ला प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि अभ्यासाला सुरुवात झाली. नोव्हेंबरच्या मध्यात इसवीसन १९०९ ला महाराणी लक्ष्मीबाई हे आपल्या पत्नीचे नाव महाराजांनी या धरणाच्या तलावाला दिले.  त्यावेळी धरणाच्या कामासाठी साधारणपणे दोन हजार कामगार कार्यरत होते.  

मेहरबान पिराजीराव बापूसाहेब घागे म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांचे थोरले बंधू यांचे मोलाचे मार्गदर्शन या धरणासाठी मिळाले. दाजीपूरच्या जंगलातील याच लक्ष्मी तलावाजवळ स्वतः छत्रपतींनी आपली राजकन्या राधाबाई उर्फ आक्कासाहेब यांच्या नावाने एक टुमदार शहर वसविले. तेच हे 'राधानगरी' शहर होय. याच परिसरात लोकवस्ती वाढावी यासाठी त्यांनी वसाहती निर्माण केल्या व शासकीय कार्यालये चालू केली. राधानगरी धरणाच्या बांधकामात महाराजांनी भरमसाठ संपत्ती खर्च केली. महाराजांच्या मृत्यू नंतर त्यांचे हे काम त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी पूर्णत्वास नेले.  

जगातील अतिसंवेदनशील समजला जाणारा, पश्चिम घाटमाथ्यावरील निसर्गाचा वरदहस्त असणारा हा परिसर त्यावेळी करवीरच्या छत्रपतींनी शिकारीसाठी राखीव ठेवला होता. अनेक ब्रिटिश अधिकारी, हिंदुस्थानातील इतर संस्थानिक, महाराजांचे स्नेही त्यावेळी राधानगरीच्या या जंगलात भेट देण्यास येत असत.  कोणतेही प्रगत तंत्रज्ञान नसताना केवळ प्रबळ इच्छाशक्ती व सामान्य प्रजेच्या भविष्यातील सुखद जीवनासाठी असणारी तळमळ याच जोरावर उभे राहिलेले राधानगरी धरण पाहण्यासाठी जगभरातील अभ्यासक त्याकाळी येत होते.

राधानगरीच्या या परिसराचा प्रामुख्याने विकास झाला तो राजर्षी शाहू महाराजांच्या वास्तव्यामुळे. त्यावेळी राखीव ठेवलेला हा भाग आज एक परिपूर्ण व विकसित वन्यजीवांसाठीचे अभयारण्य म्हणून ओळखला जातो. अनेक दुर्मिळ वनस्पती, फुलझाडे, उभयचर व सरपटणारे प्राणी, पक्षी यांचे अस्तित्व आजही येथे आहे. याच धरणाच्या पाणी साठ्यावर केवळ कोल्हापूर जिल्हा विकसित झाला नसून सोबत पाणवठ्यावर येणारी  अभयारण्यातील अनेक जनावरे आपली तहान भागवीत.

राधानगरी परिसरात विशाल-महाकाय बलशाली हत्तींना राहण्यासाठी साकारलेला हत्ती महाल; या हत्तींसोबत झुलकावणी देण्याच्या अद्भुत साठमारी खेळासाठी उभारलेले साठमारीचे आगड अशा अनेक वास्तू आजही ताठ मानेने उभ्या आहेत.  

निसर्ग, पर्यावरण, वन्यजीव याच सोबत आजही अनेक ऐतिहासिक वास्तूंमध्ये दडलेला राधानगरीचा इतिहास पर्यटकांना खुणावत आहे. निसर्गाचा समतोल साधत आता पर्यटन वाढीस अत्यंत अनुकूल आणि सुरक्षित असा हा राधानगरीचा परिसर दुसरे स्वर्गच म्हणण्यास काही हरकत नाही.
-
सौरभ मुजुमदार
दैनि तरुण भारत, कोल्हापूर.



For Value Added Tourism of Radhanagari & Dajipur call or Whatsapp .
Call us or Whatsapp .
Call or Whatsapp .
For Tourism Radhanagari & Dajipur call or Whatsapp .
Back to content