सोनियाचा दिवस बाई, सोनियाची सहल

Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Radhanagari... the dreamland!
Go to content

सोनियाचा दिवस बाई, सोनियाची सहल

Radhanagari Wildlife Sanctuary
Published by दिप्ती in Treasure of Radhanagari · Thursday 20 Jan 2022
Tags: RadhanagariHattiMahal
सोनियाचा दिवस बाई, सोनियाची सहल
काही क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्याला सोन्याची झळाळी मिळून ते क्षण "सुवर्णक्षण" होतात. तसंच दिवसांचं ही असतं. कालचा दिवस माझ्यासाठी “सुवर्णदिन” ठरला. कालचा भरलेला दिवस होता राधानगरी, दाजीपूर आणि निसर्गाबद्दल भगवत्भाव असलेल्या श्री. सुहास सर आणि श्री. कृतार्थ सरांच्या ज्ञानासोबत. मंदार दादांनी सुहास सरांची ओळख करून दिली. सुहास सरांनी माहिती द्यायला सुरुवात केली.

“जंगल म्हणजे काय? अभयारण्यात काय पाहायचं असतं? फक्त जंगलातले प्राणी पाहणं म्हणजे जंगल पहाणं का? जंगलात अनेक जैवविविधता असते. पक्षी, कीटक, साप, प्रचंड प्रकारच्या वनस्पती हे पाहणं, याबद्दल जाणून घेणं, जंगलाला समजून घेणं म्हणजे सुद्धा जंगल पाहणंच असतं. जंगल पाहताना सोबत तीन दागिने ठेवले की जंगल आपल्याला भरभरून दाखवतो. ते तीन दागिने म्हणजे शांतता, संयम आणि निसर्गाप्रती भगवत्भाव.

हाच भगवत्भाव ठेवून आम्ही जंगल पाहण्याचा, अनुभवण्याचा  प्रयत्न केला आणि आम्हाला शेकरू दिसलं. आपल्या “महाराष्ट्राचा राज्यप्राणी” काय कौतुक वाटलं आम्हाला! शेकरू जंगलाच्या कोणत्या भागात राहतो ते कसं ओळखायचं, ते झाडाची पानं कसं खातं? याची माहिती सुहास सरांनी सांगितली. फुलपाखरू उद्यानात कॉमन सेलर हे फुलपाखरू जास्त पाहायला मिळालं. तिथे फुलपाखरांवर अंडी घालणारी, फुलांमधला रस पिणारी अनेक झाडं तिथे आम्ही पाहिली. त्यातलं बदकवेल मला खूप आवडलं. शिवाय आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे झाड “फिश टेल पाम”बद्दल कृतार्थ सरांनी सांगितलं. तसेच समई, खुळखुळा, दिन का राजा, ऑस्ट्रेलियन बाभूळ अशी बरीच झाडं आम्ही तिथे पाहिली.

नंतर आमची स्वारी हत्ती महाल पहायला निघाली. हत्ती महाला बाबत माहिती मंदार दादांनी दिली. तिथे आम्ही सगळ्यांनी फोटोसेशन केले. तिथे जाऊन फोटो काढून याच.इथून पुढे मजा मस्ती करत, दंगा करत, हसत आम्ही हासण्याच्या देवराईमध्ये पोहोचलो. नष्ट होत चाललेल्या देवराया का जपल्या पाहिजेत? त्या का नष्ट होत चालल्या आहेत? आणि त्या राखण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? याची माहिती सुहास सरांनी सांगितली. आम्ही अजून झाडं बघितली. कास पठारावर फुलणार पहिलं फूल“सोनकी” आम्ही पाहिलं. वाकेरी, रानजायफळ, देवजांभूळ, गारंबीची सगळ्यात मोठी शेंग मदनफळ, सुरंगी, अंजनीचं फुल,गाव्याला आवडणारं कारवी अशी किती, किती आणि काय काय पाहिलं म्हणून सांगू! हे सगळं निसर्गाच्या प्रेमात पाडणारं होतं आणि जाणीवही करून देणारं की हे आपण जपायचंय, याची काळजी घ्यायची.

नंतर तर आम्ही स्वर्गातच होतो. समोर हजारो फुलपाखरे होती. माझा आनंद गगनात मावेना अक्षरशः! सगळी ब्लू टायगर. आहा! मला प्रचंड म्हणजे प्रचंड आनंद झाला होता.आपल्या जेवण्याच्या प्रत्येक तिसऱ्या घासाला आपण फुलपाखरांचे आभार मानले पाहिजेत कारण परागीकरणाचं खूप मोठं काम फुलपाखरं करतात. ही माहिती सुहास सरांनी सांगितली. नंतर आम्ही शिवगडच्या शेजारी असलेल्या पठारावर गेलो. तिथे थोडावेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवून परतीच्या वाटेला लागलो.

परागीकरण करणारी फुलपाखरं, बचत शिकवणाऱ्या मधमाश्या, भरभरून देणारा निसर्ग आणि याच्या बद्दल आदर म्हणून आपणही निसर्गाचं काही देणं लागतो म्हणून खूप तळमळीनं सांगणारे सुहास सर.

हे सगळेच अनुभव विलक्षणीय  आहेत माझ्यासाठी. सुहास सरांनी  सांगितलेला एक नी एक शब्द मनाला भिडणारा होता.

आपणही  अशी तळमळ आपल्यात आणण्याचा प्रयत्न करुया. त्यासाठी निसर्गासोबत राहूया. निसर्गाबद्दल कृतज्ञ राहू या.

धन्यवाद.

दिप्ती,
आनंदी बालभवन,
कोल्हापूर.
९जानेवारी, २२
९१५८९९८८३१


For Value Added Tourism of Radhanagari & Dajipur call or Whatsapp .
Call us or Whatsapp .
Call or Whatsapp .
For Tourism Radhanagari & Dajipur call or Whatsapp .
Back to content